बहुजननामा ऑनलाइन टीम – पुण्यातील जंबो सेंटर 1 तारखे पासून बंद करण्यात येणार आहे. या सेंटर मध्ये सध्याच्या स्थिती मध्ये 40-50 पेशंट आहेत. या जंबो सेंटर ची क्षमता 800 बेड ची आहे. सध्याच्या स्थिती ला मनपा द्वारे 600 बेड वर पैसे खर्च केले जात आहेत. परंतु पेशंट फक्त 40-50 आहेत. हा होणारा आवाजावी खर्च टाळण्यासाठी हे जंबो सेंटर बंद(Dr. Ashish Bharti) करण्यात येत असून, मार्च-एप्रिल पर्यंत कोविड पूर्णपणे नष्ट झाला असेल. त्याच प्रमाणे जंबो चे स्ट्क्चर ही मार्च पर्यंत तसेच ठेवण्यात येनार आहे. ही माहिती पुणे मनपा चे आरोग्य अधिकारी डॉ. आशिष भारती यांनी दिली.
पुढे बोलताना भारती म्हणाले कि, पीएमआरडी चे पैसे संपले आहेत. राज्य शासना कडे ही जंबो कोविड सेंटर ची बिले पेंडीग आहेत. पेशंट कमी झाले तरी जंबो च्या 600 बेड चा खर्च होत आहे. त्यांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचने नुसार जंबो बंद करण्यात येनार असून कोविड च्या पेशंट साठी पुणे महानगरपालिके चे हॉस्पिटल खुले करण्यात आली आहेत. येथे कोविड साठी स्वतंत्र यंत्रणाही आहे. भविष्यात कोविड चे पेशंट वाढले तर 1-2 दिवसात परत जंबो सेंटर सुरू करण्यात येईल. कारण जंबो सेंटर चे स्ट्क्चर मार्च पर्यंत तसेच ठेवण्यात येणार आहे. फक्त मैन पॉवर कमी करण्यात येणार आहे.