बहुजननामा ऑनलाइन टीम – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते येत्या 13 फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्याला छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे, होळकर घराण्याचे 16 वे वंशज यशवंतराव होळकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
गडाचा जिर्णोद्दार करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या राजमाता आहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आला आहे. तब्बल 55 लाख रुपये खर्चून गडावर जाणा-या पायरी मार्गावर चौथऱ्यासह सुमारे 20 फूट उंचीचा ब्रांझ धातूचा हा पुतळा उभारला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विविध परवानग्या घेऊन शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली आहे.