बहुजननामा ऑनलाइन टीम – अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांनी हिंदी सिनेमातील बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री अशी ओळख तयार करून प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांनी सिनेमात पदार्पण केलं तेव्हा त्या दिसायला खूप कोवळ्या असल्याने त्यांना बालकलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. लवकरच त्या अॅक्ट्रेस पूनम ढील्लन सोबत इंडियन आयडलमध्ये गेस्ट बनून येताना दिसणार आहे. या शोमध्ये त्या आपल्या लाईफमधील अनेक इंटरेस्टींग गोष्टींचा खुलासा करताना दिसणार आहे.
सोनी टीव्हीनं इंस्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दोन्ही अॅक्ट्रेस खूप मस्ती करताना दिसत आहेत. दोघीही एकेक डायलॉग आपल्या अंदाजात बोलताना दिसत आहेत.
एका इंग्रजी रिपोर्टनुसार, दिवंगत वेटरन अॅक्टर ऋषी कपूर यांची आठवण काढत पद्मिनी कोल्हापुरे शोमध्ये सांगणार आहेत की, सिनेमाच्या शुटींगदरम्यान ऋषी यांनी दोन वेळा त्यांचा जीव वाचवला होता. पद्मिनी यात खुलासा करणार आहेत की, होगा तुमसे प्यारा कौन दरम्यान पूर्ण सेटवर आग लागली होती. ऋषी यांनी त्यांचा जीव वाचवला होता. नंतर पुन्हा एकदा अशीच घटना घडली जेव्हा दोघं प्रेम रोग ची शुटींग करत होते. इंडियन आयडलचा हा एपिसोड या वीकेंडला प्रसारीत केला जाणार आहे.
पद्मिनी यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयचं झालं तर त्या आता मराठीतही झळकल्या आहेत. प्रवास या सिनेमात त्या अशोक सराफ यांच्यासोबत काम करताना दिसल्या आहेत. दोघेही प्रथमच एकत्र काम करताना दिसले आहेत. 14 फेब्रुवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झालाआहे. या सिनेमात त्यांच्याव्यतिरीक्त विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदी कलाकारही होते. यश आणि नातं यातील प्रवास या सिनेमात पाहायला मिळाला. ड्रीम गर्ल, सत्यम शिवम सुंदरम आणि इंसाफ का तराजू अशा काही सिनेमातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. प्रेम रोग, सौतन, वो सात दिन, प्यार झुकता नहीं अशा अनेक मोठ्या सिनेमात त्यांनी काम केलं आहे. 2019 साली आलेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या पानीपत सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे.