पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | पुण्यातील (Pune News) एका लॉन्ड्री चालकाने तब्बल लाखो रुपये किंमत असलेले दागिने (Gold Ornaments) ग्राहकाला परत केले आहे. लॉन्ड्री चालकाच्या या प्रामाणिकणामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहे. इस्त्री साठी दिलेल्या कोटमध्ये तब्बल 6 लाखांचे दागिने (6 lakh Jewellery) होते. सोन्याच्या प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे ते दागिने लॉन्ड्री चालकाने परत केले आहे.
सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, गळ्यातील हार असा सुमारे 6 लाख रुपयांचे दागिने परत करून अमराठी लॉन्ड्री चालकाने प्रमाणिकपणा दाखविला आहे. तर, व्यंकटेश सोसायटीमधील अशोक कनोजिया (Ashok Kanojia) यांनी रविवारी कपडे इस्त्रीसाठी दिल्यानंतर मंगळवारी इस्त्री करताना कोटाच्या खिशामध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. सोन्याच्या दागिन्यांचे पाकिट बाजूला काढून कपड्याला इस्त्री केल्यानंतर त्यांना घरी नेऊन दिले. त्यावेळी ते सोन्याचे दागिने मिळत नसल्याने हतबल झाले होते. त्यांना कपड्यासह सोन्याचे दागिने दिल्यानंतर त्यांनी जीव भांड्यात पडला. असं शुभलक्ष्मी ड्रायक्लीनिकचे लॉन्ड्री चालक राजमल कनोजिया (Rajmal Kanojia) (वय 28, रा. हांडेवाडी रोड, न्हावले नगर, पुणे) याने सांगितलं. (Pune News)
राजमल कनोजिया (Rajmal Kanojia) यांनी सांगितलं की, ”6 लाख रुपयांचे दागिने घेऊन माझा संसार सुखाचा होणार नाही आणि मला समाधान मिळणार नाही. प्रामाणिकपणा ही आयुष्याची मोठी कमाई आहे. मागिल ३ वर्षांपासून लॉन्ड्री व्यवसाय करीत असून, परिसरातील सोसायट्यातून कपडे आणून इस्त्री आणि ड्रायक्लीन करून देत आहे. आतापर्यंत कोणाच्या पैशालाही धक्का लावला नाही. कष्टाची कमाईच समाधान देते.”
Web Title :- Pune News | pune laundry man returns gold ornaments worth rs 6 lakh to customer who forgot in coat wallet
Latur News | शिरूर ताजबंद-अहमदपूर महामार्गावरील थोरलीवाडी पाटीजवळ कार-दुचाकीच्या अपघातात दोन ठार
Multibagger Stock | ‘या’ 55 रुपयांच्या शेयरची कमाल, 1 लाखाचे झाले 69 लाख रुपये