नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिना सुरू होण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेने देशभरातील बँकांची सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये रविवार आणि दुसर्या आणि चौथ्या शनिवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या यादीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये बँका 12 दिवस बंद राहतील. (Bank Holidays in Feb 2022)
- Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’
- Latur News | ….अन् ग्रामपंचायतीसमोर चिता रचून केले अंत्यसंस्कार
फेब्रुवारीमध्ये वसंत पंचमीला गुरु रविदास जयंतीनिमित्त सुट्टी असेल. यासोबतच अनेक राज्यांमध्ये स्थानिक सणानिमित्त बँका बंद राहतील. अशा स्थितीत माहिती नसताना तुम्ही बँकेत गेलात तर बँक बंद असू शकते. त्यामुळे बँकेला भेट देण्यापूर्वी एकदा सुट्ट्यांची यादी तपासून पहा.
12 दिवस बँकेला सुट्टी
आपल्या देशात प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे आणि तिथले सणही वेगळे आहेत. यावेळी फेब्रुवारी महिन्यात अनेक स्थानिक सण होत आहेत. म्हणून, जेव्हा बँकेत जाण्याचा विचार कराल, तेव्हा बँकिंगच्या सुट्ट्यांची यादी नक्की पहा. कारण त्या दिवशी बँकेला सुट्टी असेल तर तुमची गैरसोय होऊ शकते.
बँकेच्या सुट्ट्यांची यादी
– फेब्रुवारी 2 – सोनाम लोच्चर (गंगटोकमध्ये बँका बंद राहतील)
– 5 फेब्रुवारी – सरस्वती पूजा / श्री पंचमी / वसंत पंचमी (आगरतळा, भुवनेश्वर, कोलकाता येथे बँका बंद)
– 6 फेब्रुवारी – पहिला रविवार
– 12 फेब्रुवारी – महिन्याचा दुसरा शनिवार
– 13 फेब्रुवारी – दुसरा रविवार
– 15 फेब्रुवारी- मोहम्मद हजरत अली वाढदिवस/लुई-नागईन्नी (इंफाळ, कानपूर, लखनौमध्ये बँका बंद)
– 16 फेब्रुवारी – गुरु रविदास जयंती (चंदीगडमध्ये बँका बंद राहतील)
– 18 फेब्रुवारी – डोलजात्रा (कोलकातामध्ये बँका बंद राहतील)
– 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती
– 20 फेब्रुवारी – रविवार
– 26 फेब्रुवारी – महिन्याचा चौथा शनिवार
– 27 फेब्रुवारी – रविवार
Web Title :- Bank Holidays in Feb 2022 | bank holidays in feb 2022 banks closed for 12 days in the month of february
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Rajesh Tope | ‘राज्यात मास्क मुक्ती होणार का?’ राजेश टोपे म्हणाले…
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव