बहुजननामा ऑनलाइन टीम –पुणे शहरात घरफोडीच्या घटना वाढत असताना चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पुणे पोलिसांसमोर असताना एक धक्कादायक प्रकार (police fled )समोर आला आहे. चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांना पकडण्याऐवजी पोलिसच चोरट्यांना पाहून पळून गेले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.29) औंधमधील सिद्धार्थनगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीत मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली.
पुण्यात मध्यरात्री तीनच्या सुमारास चार चोरटे एका सोसायटीत घुसले. वॉचमनला दोघांनी चाकू दाखवून पकडून ठेवले तर दोघांनी वर जाऊन कटरच्या सहाय्याने फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. आवाज आल्याने चोर आल्याचा संशय सोसायटीतील एका व्यक्तीला आहे. त्याने याची महिती तात्काळ पोलिसांना फोन करून दिली. थोड्याच वेळात पोलीस गाडीवरून हजरही झाले. त्यांनी चोरट्यांना बघितलं देखील, मात्र, त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी पोलिसांनीच तेथून पळ काढला.
दरम्यान, चोरट्यांनी सोसायटीतील चार फ्लॅटचे कुलूप तोडले. एका फ्लॅटचे कुलूप तोडत असताना लोकांचा आवाज आल्याने चोरटे पळून गेले. चोरट्यांनी पाचव्या मजल्यावरील प्लॅटचे कुलूप तोडता आले नाही. सुदैवाने बंद प्लॅटमध्ये कोणी राहत नसल्याने त्यांच्या हाती जास्त काही लागले नाही. पण चोरट्यांनी जाताना एका घरातील LCD TV चोरून नेला.
चोर आल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. बंदूक असूनही एक पोलीस गाडी वरुन पळून जातानाचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यांच्या नंतर चोरटे पळून गेले. पोलिसांनी त्यांच्याकडे असलेल्या wireless phone वरुन पुढे संदेश पाठवून आणखी पोलिसांना बोलावून घेऊन चोरट्यांना पकडता आले असते. मात्र, पोलिसांकडून असे काही करण्यात आले नसल्याचे दिसून येत आहे. गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे या घटनेवरून सिद्ध होते. त्यामुळेच पुणे शहरात घरफोडी व गुन्ह्यांची संख्या वाढत आहे.