पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | उत्तरेकडील थंड वार्यांचा जोर वाढल्याने राज्यात थंडीची लाट आली असून अनेक शहरांमधील किमान तापमान (Minimum Temperature) १० अंशांच्या खाली गेले आहे. पुणे शहरात बुधवारी पहाटे किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. या हंगामात प्रथमच सिंगल डिजिटमध्ये आले आहे. (Pune News)
मंगळवारी रात्रीपासून थंडीचा कडाका वाढला होता. आज पहाटेपासून हवेत खूप गारठा जाणवत होता. विदर्भात अवकाळी पाऊस तर पश्चिम महाराष्ट्र थंडीचा कडाका अशी स्थिती सध्या राज्यात दिसत आहे.
उत्तर भारतामध्ये किमान तापमानात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून उत्तर प्रदेशातील मेरठ येथे निचांकी १.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदविले गेले आहे.
शहरातील किमान तापमान
एनडीए – ८.२
लोणी काळभोर – ८.७
शिवाजीनगर – ९.७
पाषाण -१०.१
दौंड – १०.९
तळेगाव – ११.१
हडपसर – १२.८
कोरेगाव पार्क – १४.४
- Ahmednagar Accident News | नगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात; एस टी बस ट्रॅक्टरचा ढवळपुरी फाट्यावरील अपघातात सहा जण ठार
- Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल