अहमदनगर : Ahmednagar Accident News | कल्याण -नगर महामार्गावरील (Kalyan-Nagar Highway) ढवळपुरी फाट्यावर एस टी बस आणि ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात (Ahmednagar Accident News) झाला असून त्यात ६ जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
निलेश रावसाहेब भोर (रा. देसवडे), प्रकाश रावसाहेब थोरात (रा. वारणवाडी, ता. पारनेर), अशोक चिमा केदार, जयवंत रामभाऊ पारधी, संतोष लक्ष्णम पारधी (रा. जाबुत खुर्द, ता. संगमनेर), सचिन कांतीलाल मंडलीचा (रा. टाकळी मानुर, ता. पाथर्डी) असे मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे – मेहकर एस टी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको गाडीची धडक झाली.
एस टी बस ठाणेहून नगरला येत असताना हिवरे कोरडा शिवारात उसाची ट्रॉली पलटी होऊन ऊस रस्त्यावर पडला होता.
त्याला दुसरा ट्रॅक्टर वाला ट्रॅक्टर पुढे लावून बाजूला करीत होता. त्यातील मजूर मदत करत होते.
हे पाहून इको कार चालक थांबून पार्किंग लाईट लावून रोडवरील वाहनांना दिशा देत होता.
त्यावेळी वेगाने आलेल्या एस टी बसने ट्रॅक्टर व इको गाडीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघाताचे वृत्त समजात स्थानिक तरुण मदतीला धावून गेले. त्यात एस टीचा पत्रा लागल्याने एक तरुण जखमी झाला आहे.
मृतांपैकी ५ जणांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात तर एकाचा अहमदनगर इथं उपचार सुरू असताना मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- Pune Pimpri Chinchwad Crime News | कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, एकाला अटक; लष्कर परिसरातील घटना
- Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे : बदनामी करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंधाची मागणी, मित्रावर गुन्हा दाखल
- Pune Pimpri Chinchwad Crime News | चुलत्याकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पुण्यातील धक्कादायक घटना