पुणे न्यूज (Pune News) : Pune News | जिल्ह्याच्या खेड (Khed) तालुक्यातील कोहिंडे बुद्रुक येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात सांबराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आज सकाळी ८ वाजता ठाकरवस्ती परिसरात हा प्रकार घडला आहे. परिसरात काही दिवसापासून भटक्या कुत्र्यांच्या (Stray dogs) हल्ल्यात सांबर, भेकर, मोर, ससे यांचा मृत्यू झाला असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
Pune News | dogs attack on sambhar dies at kohid budruk tahsil khed
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी येथील गुरव वस्तीच्या (Gurav Vasti) दिशेने एक सांबर प्लेट येत होते. त्याच्या पाठीमागे आठ ते दहा मोकाट कुत्री लागली होती.
कुत्र्यांनी सांबराला जखमी केले होते. कुत्र्याच्या तावडीतून सुटका करण्यासाठी जखमी अवस्थेत सांबर गुरव वस्तीजवळून वाहणाऱ्या कुमंडला नदीच्या पात्रातील बंधाऱ्यात गेले. पण तरीही कुत्र्यांनी त्याचा पाठलाग सोडला नाही. साबंर पाण्यात पोहून पोहून जखमी झाले होते. हि घटना ज्यावेळी स्थानिक नागरिकांना समजली त्यावेळी प्रदीप शिंदे, अमोल कुटे, रामदास खंडे, शिवाजी खंडे, नाथा खंडे, पप्पु खंडे यांनी या सांबराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि वन अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. घटनास्थळी वन विभागाचे (Forest Department) कर्मचारी येई प्रयत्न सांबराचा मृत्यू झाला होता.
Web Title : Pune News | dogs attack on sambhar dies at kohid budruk tahsil khed
Gold Price Today | खुशखबर ! सोन्याच्या किंमतीत आज मोठी घसरण, ₹ 8,750 स्वस्त झाले सोने, जाणून घ्या दर