बहुजननामा ऑनलाइन टीम – रोटरी डिस्ट्रिक 3131 यांच्या तर्फे आयोजित रोटरी मिक्स विंटर कप( Rotary Mix Winter Cup) क्रिकेट 2021 स्पर्धेत गटसाखळी फेरीत बीकेसी स्ट्रायकर्स आणि वाणी वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उदघाटनाचा दिवस गाजवला.
आरएस खांदवे येथील क्रिकेट मैदान व लिजेंड्स क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत अ गटाच्या सामन्यात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या फैयाज लांडगे(3-30) याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत बीकेसी स्ट्रायकर्स संघाला अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाविरुद्ध 14धावांनी विजय मिळवून दिला. पहिल्यांदा खेळताना बीकेसी स्ट्रायकर्स संघाने 15षटकात 7बाद 136धावा केल्या. यात अविनाश बारणे नाबाद 28धावा, अतुल भगत 17धावा, अनिल मांडके 16धावा, सुनील मंधन 14धावा, श्रीधर प्रभू 12धावा यांनी संघाच्या डावाला आकार दिला. अल्टीमेट ऍडव्हेंचर्सकडून विजय कोतवाल(2-18), आनंद मेघरजनी(1-2), शेखर दालमिया(1-11), भरत पुनुमिया(1-21) यांनी सुरेख गोलंदाजी केली. या आव्हानाचा पाठलाग करताना अल्टीमेट ऍडव्हेंचर्स संघाला 15षटकात 8बाद 122धावापर्
दुसऱ्या सामन्यात ब गटाच्या सलामीच्या लढतीत भूषण देशपांडे(3-17 व नाबाद 19धावा) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर वाणी वॉरियर्स संघाने कु-बिल्ट मास्टर्स संघावर 7 गडी राखून विजय मिळवत विजयी सलामी दिली. प्रथम फलंदाजी करताना विक्रम खैय्या 32धावा, राहुल कामठे 23 धावा व संतोष जाधव 17 यांनी केलेल्या धावांच्या जोरावर कु-बिल्ट मास्टर्स संघाला 15 षटकात 6बाद 100धावा करता आल्या. वाणी वॉरियर्स संघाकडून भूषण देशपांडे(3-17), विजय नवले(2-14), सुधीर काकडे(1-21)यांनी सुरेख गोलंदाजी करत कु-बिल्ट मास्टर्स संघाला 100धावावर रोखले. याच्या उत्तरात वाणी वॉरियर्स संघाने हे आव्हान 12.1षटकात 3बाद 104धावा करून पूर्ण केले. यामध्ये सागर निकलजे 27धावा,महेश घोरपडे नाबाद 24धावा, अरविंद चौहान 18 धावा,भूषण देशपांडे नाबाद 19धावा करून संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. सामन्याचा मानकरी भूषण देशपांडे ठरला.
स्पर्धेचे उदघाटन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.रश्मी कुलकर्णी आणि रोटरी डिस्ट्रिक 3131चे क्रीडा विभागाचे संचालक रो. प्रमोद पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एचयुव्हीइ फार्माचे सरव्यवस्थापक डॉ.देवेंद्र हुडा आदी मान्यवर उपस्थित होते.