• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Pune News : खाशाबा जाधव पुरस्काराने बालारफि शेखचा गौरव, पुण्यात खाशाबा जाधव यांची 96 वी जयंती साजरी

by sajda
January 15, 2021
in इतर
0
Khashaba Jadhav Award

Khashaba Jadhav Award

बहुजननामा ऑनलाइन टीम – धु्रवतारा फाऊंडेशनच्या वतीने ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची 96 वी जयंती पुण्यात महाराष्ट्र क्रीडा दिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना दुसरा खाशााब( Khashaba Jadhav Award) जाधव पुरस्काराने गौरवित करण्यात आले.
15 जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिन महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने हनुमान कुस्ती आखाडाच्या सभागृहात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या 96 वी जयंतीचा विशेष समारंभ साजरा झाला. यावेळी महाराष्ट्र केसरी बालारफि शेख यांना पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांच्या हस्ते खाशाबा जाधव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  मानचिन्ह, पुस्तके, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी हनुमान कुस्ती आखाडाचे प्रशिक्षक गणेश दांगट, धु्रवतारा फाऊंडेशनचे अध्यक्ष व क्रीडालेखक संजय दुधाणे, गोरख वांजळे, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, गणेश घुले, कुस्ती प्रशिक्षक रामसिंग, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी पहिला पुरस्कार ऑलिम्पिकपटू मनोज पिंगळे यांना देण्यात आला होता.
देशाचे पहिले ऑलिम्पिदक पदक विजेते खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी लेखक संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या अनेक आठवणींला उजाळा दिला. प्रतिकुल परिस्थितीवर मात खाशाबांनी जिंकलेले पदकाची कथा त्यांनी उपस्थित कुस्तीगीरांना सांगितली. खाशाबांचे पदक हे आजही महाराष्ट्राचे एकमेव ऑलिम्पिक पदक असल्याची खंत व्यक्त करून संजय दुधाणे पुढे म्हणाले की, देशासाठी खेळताना खाशाबा जाधव यांनी जिंकलेले पदक आजही प्रेरणादायी आहे. त्यांची जयंती शासनाच्या क्रीडा खात्याने, कुस्ती परिषदेने साजरी केली पाहिजे.
खाशाबा जाधव हे नावातच एक चैतन्य आहे, आम्हा कुस्तीगीरांचे ते दैवत असल्याचे सांगून गणेश दांगट पुढे म्हणाले की,खाशाबांचा वारसदार महाराष्ट्रातून निर्माण झाला पाहिजे. तो प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. खाशाबा जाधव हे कुस्तीतच नव्हे तर अ‍ॅथलेटिक्य, कबड्डी खेळातही आणि अभ्यासातही अव्वल होते अशी माहिती सांगत राजेंद्र बांदल पुढे म्हणाले की, हनुमान आखाड्यातील राष्ट्रीय विजेत्या खेळाडूना पेरिविंकल शाळा व हिमालय पतसंस्थेकडून मदत दिली जाईल.

Tags: Balarfi SheikhKhashaba Jadhav Awardबालारफि शेखचा गौरव
Previous Post

भारतीय लष्करासाठी IIT च्या माजी विद्यार्थ्यांनी बनवलं ड्रोन, 130 कोटींचा करार

Next Post

Pune News : पानिपतवीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना, मर्दानी खेळांचा थरार

Next Post
Panipatveer Damajirao Gaikwad

Pune News : पानिपतवीर दमाजीराव गायकवाड यांना अनोखी मानवंदना, मर्दानी खेळांचा थरार

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मंत्रिपदासाठी ‘या’ आमदारांची नावे चर्चेत

12 hours ago

मोदी सरकार कोरोना लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

6 days ago

सकाळ-संध्याकाळ एका दिवसात किती चालावं ?, जाणून घ्या 5 ते 60 वर्षा दरम्यानच्या लोकांसाठी चालण्याचा फिटनेस प्लॅन

2 days ago

Government Job : उच्च न्यायालयात सहायक विभाग अधिकारी पदांवर 202 पदांसाठी भरती, पगार 1 लाख रूपये, जाणून घ्या

4 days ago

नीरा टंडन यांच्या नियुक्तीला सिनेटमध्ये विरोध, बायडन यांनी पहिल्या कृष्णवर्णीय महिलेची OMB च्या संचालकपदी केली निवड

6 days ago

संजय राठोड पोहरागडावर पोहचले अन् समर्थकांवर जोरदार लाठीचार्ज

6 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat