पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | पुण्यातील अवधूत उर्फ आप्पा भगवान उभे (Avadhoot Appa Bhagwan Ubhe) यांचे अल्पशा आजारपणामुळे नुकतेच (१० फेब्रुवारी २०२३ रोजी) निधन झाले. पुण्यातील क्रिडा क्षेत्रामध्ये आप्पा या नावाने ते प्रसिध्द होते. पुण्यातील क्रिकेट क्षेत्रातामध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केले आहे. ‘बॅटींचा डॉक्टर’ अशी ओळख त्यांची क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये होती. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये अप्पा उभे यांचे ‘उभे स्पोर्ट्स’ हे क्रिकेट साहीत्यांचे दुकान आहे.. सर्व प्रकारच्या फलंदाजीसाठी आवश्यक असलेल्या बॅट व त्याची दुरूत्या करणे, यासाठी ते प्रामुख्याने प्रसिध्द होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्या दुकानामध्ये ते काम करत राहीले. (Pune News)
आप्पा उभे यांचे वडील भगवान उभे पीवायसी मैदानावर वर ग्राउंडसमन म्हणुन काम करत असताना क्रिकेट महर्षी दि.ब. देवधर यांना गोलंदाजी देखील करत. तेव्हाच 1948 साली उभे स्पोर्ट्स ची स्थापना भगवान यांनी केली.
अप्पा यांच्याकडे क्रिकेट लिजंडस् रमाकांत देसाई, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे,
मधू गुप्ते असे एकापेक्षा एक नावाजलेले क्रिकेटपटू त्यांच्या दुकानामध्ये भेटी द्यायचे.
क्रिकेटच्या जवळपास तीन पिढ्या पाहीलेल्या अप्पा यांच्याकडे आत्ताचे केदार जाधव, अंकित बावणे, स्वप्निल गुगळे राहुल त्रिपाठी, ऋतुराज गायकवाड़ ,स्मृति मानधना असे खेळाडूही आवर्जुन बॅट दुरुस्त करून घेत असत.
२० वर्षांपासून क्रिकेट क्षेत्रामध्ये काम करत असलेला हेमंत उभे यांचे ते वडील होत.
अप्पा ८० वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, मुलगा, नातवंते, भाऊ असा परीवार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Pune News | Avadhoot Appa Bhagwan Ubhe Passes Away
हे देखील वाचा :
Alia Bhatt | आलियाने शेअर केला बाळाचा फोटो?; अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव