नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेले तीन दिवस सुरु असलेली सुनावणी गुरुवारी संपली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद (Argument) ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. मात्र, अद्याप निश्चित तारीख सांगितली नाही. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची ही सुनावणी पाच न्यायमूर्तीचे खंडपीठ (Five-Judge Bench) घेणार की सात जणांच्या घटनापीठाकडे (Constitution Bench) होणार याबाबत न्यायालयाने कोणतेही भाष्य केले नाही. ठाकरे गटाने (Thackeray Group) सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) सुनावणी ही सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवावी अशी मागणी केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भविष्यात अडचणी येऊ शकतात
गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर शिवसेनेचे नेते अनिल परब (Shiv Sena Leader Anil Parab) यांनी सांगितले की, हे प्रकरण सात जणांच्या घटनापीठाकडे जाईल असे आम्हाला वाटते. त्याचं कारण म्हणजे नबाम रेबिया केसमध्ये (Nabam Rabies Case) जे मुद्दे नव्हते ते मुद्दे या खटल्यात उपस्थित झालेले आहेत. नबाम रेबिया खटल्यावर पाच न्यायाधीशांनी निर्णय दिला होता. आता बदललेल्या परिस्थितीतही पाच न्यायाधीश निर्णय देणार असतील तर भविष्यात काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खटला सात सदस्यीय घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी आम्ही केली आहे. तसेच आमची मागणी मान्य होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra Political Crisis)
सुनावणीत 8 मुद्दे विचारात घेतले
न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. या खटल्यावरील सुनावणीमध्ये आठ मुद्दे विचारात घेतले आहेत.
या पैकी एका मुद्यावर निकाल सात सदस्यीय घटनापीठ घेईल असे वाटते. त्यानंतर सर्व मुद्यांवर चर्चा होईल,
असे वाटत आहे. कारण बरेचसे मुद्दे एकमेकांत गुंतलेले आहेत. त्यामुळे जेव्ह एका मुद्यावर निर्णय होईल,
त्यावेळी इतर मुद्यांवरील निर्णय आपोआप होईल, असे अनिल परब यांनी सांगितले.
सत्याचा विजय होईल – संजय राऊत
न्यायालयात आमच्या वकिलांनी ठामपणे बाजू मांडली. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.
अजूनही या देशात न्याय जिवंत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) सद्सद्विवेक बुद्धीवर आमचा विश्वास आहे.
रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती या व्यवस्थेत आहेत. म्हणून न्यायालय जिवंत आहे. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे.
हेच या महाराष्ट्राचं सत्य आहे आणि या सत्याचा विजय नक्कीच होईल असा आम्हाला विश्वास असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title : – Maharashtra Political Crisis | anil parab comment on shiv sena cash and issues in eknath shinde and uddhav thackeray group
हे देखील वाचा :