बहुजननामा ऑनलाइन टीम – कोविड-१९ला प्रतिबंध घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचालीवर मर्यादा आल्या आहेत. आता त्यांना नव्याने व्यायाम सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मान्यतेने तसेच फिटइंडो, ‘एक्सएल रुट्स’ आणि पेन्टा प्ले यांच्या वतीने ऑनलाईन ‘फिटनेस महासंग्राम(Fitness Mahasangram) चे आयोजन करण्यात आले आहे.
१४ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या काळात ही ऑनलाईन स्पर्धा होणार आहे. यात सहभागी विद्यार्थी व्यायामाचे व्हिडिओ रेकॉर्ड करून पाठवतील. “लॉकडाऊनच्या काळात घरात राहून निरुत्साही झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये व्यायामाबाबत पुन्हा उत्साह निर्माण व्हावा, हा उद्देश ठेऊन शासनाच्या मान्यतेने फिटनेस महासंग्राम हा क्रीडा उपक्रम राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यासोबतच क्रीडा शिक्षकांनादेखील यात सहभागी होण्याची संधी आहे,” अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी सोमवारी (दि. ११ जानेवारी २०२१) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी फिटइंडो चे संस्थापक संदीप चोगटू, एक्सएल रुट्स’चे संस्थापक निलेश खानापूरकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
निलेश खानापूरकर म्हणाले, “स्पर्धेला कूपर इन्स्टिट्यूट, बॉडीनेटिक, रिव्हेल, रोटरी क्लब ऑफ पुणे, लोकमान्यनगर यांचे प्रायोजकत्व तर क्रिक किंगडम, फिनफिट एज्युकेशन, एनीटाइम डॉट कॉम, पेंटाप्ले यांचे सहकार्य लाभले आहे. ८ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांची ८ ते ११ वर्षे, १२ ते १४ वर्षे १५ ते १८ वर्षे मुले आणि मुलींचे गट अशी विभागणी करण्यात आली आहे. प्राथमिक फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी असे या स्पर्धेचे स्वरूप असेल.
शिल्पा चाबुकस्वार या स्पर्धे साठी समन्वयक तर समीर सूर्यवंशी सहायक म्हणून काम पाहणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.monaormatharuangram.com या संकेतस्थळावर लिंक उपलमा करून देण्यास येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी ९९ रुपये प्रवेश की ठेवण्यात आली आहे. यात एकूण ५ लाख रापयांधी पारितोषिके देण्यात येतील. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यालाई प्रमाणपत्र देण्यात येईल, असे संदीप चोगूट यांनी सांगितले.
क्रीडा शिक्षकांनीही सहभागी व्हावे- विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी
या उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसोबतच क्रीडा शिक्षकदेखील यात सहभागी होऊ शकतात. त्यांनी यात सहभाग घेतल्यास विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढेल. शिवाय सर्वाचे आरोग्य चांगले राहील.