पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | पुण्यातील मुंबई-बंगलोर महामार्गावर (Mumbai-Bangalore Highway) नवले ब्रीज जवळ आज सकाळी पुन्ह भीषण अपघात झाला. कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो वेगाने पाठीमागे गेला आणि काही वाहनांना जाऊन धडकला. नवले ब्रीज जवळ झालेल्या या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तिघांमध्ये चेतन सोळंकी (Chetan Solanki) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मुळचा धुळ्याचा असलेला चेतन सोळंकी हा पुण्यातील एका कंपनीत कामाला आहे. चेतनचे अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी लग्न (Got Married Just 15 Days Ago) झाले होते. नव्या नवरीला घेऊन तो पाच दिवसांपूर्वी पुण्यात आला होता. नेहमीप्रमाणे आज सकाळी तो कामावर जाण्यासाठी निघाला होता. गाडीची वाट पाहात तो मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रीज जवळ उभा होता. कंपनीची गाडी त्याला नेण्यासाठी येण्यापूर्वीच ब्रेकफेल झालेला कंटनर काळ बनून आला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
चेतनचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. चेतनला पाहण्यासाठी कुटुंब ससून हॉस्पिटलमध्ये (Sassoon Hospital) पोहोचले. मृतदेहाचे दोन तुकडे झालेल्या चेतनला ओळखणंही कठीण झाले. त्याच्या पश्चात दोन बहिणी (Two sister) असून एका बहिणीचे लग्न झाले आहे. तर दुसऱ्या बहिणीचे लग्न अद्याप झालेले नाही. तिच्या लग्नाची जबाबदारी चेतन याच्यावर होती. चेतनचा अपघातात मृत्यू (Accidental Death) झाला आहे हे त्याच्या पत्नीला कसे सांगायचे असा प्रश्न नातेवाईकांसमोर आहे. (Pune Navale Bridge Accident)
अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरुन पसार झाला आहे. सिंहगड पोलीस ठाण्यात (Sinhagad Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस फरार कंटेनर चालकाचा शोध घेत आहेत.
Web Title : Pune Navale Bridge Accident | young man who got married just 15 days ago died accident near navale bridge pune
MPSC Exam | 2 जानेवारीला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली
Pune Vehicle sales | पुण्यात 6 महिन्यांत 63 हजारांहून जादा वाहनांची विक्री