पुणे : बहुजननामा ऑनलाईन – घरात चोरी करत असताना पाहिल्याने ८० वर्षीय जेष्ठ महिलेचा खुनाचा उलघडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांनी २४ तासात आरोपीला जेरबंद केले आहे. नातेवाईक असणाऱ्यानेच आजीबाईंच्या खून केल्याचे उघड झाले आहे. सुनिल लिंबा मेमाणे (वय २७, रा. चावंड ता. जुन्नर, जि. पुणे) असे अटक केल्याचे नाव आहे. यात जिजाबाई अंबु भांगरे (वय ८०, रा. साकिरवाडी, ता. अकोले, जि. अहमदनगर, मुळ रा. निमगिरी, खांडेचीवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) खून झाला आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिजाबाई या निमगिरी येथे एकट्याच राहत होत्या. दरम्यान यातील फिर्यादी किसन बारकु सावळे यांच्या त्या आत्या होत्या. तर आरोपी हा फिर्यादीचा नात्याने भाच्चा लागतो. दरम्यान सुनील याला पैशांची आवश्यक्ता होती. त्यामुळे तो दोन दिवसापूर्वी दुपारी जिजाबाई यांच्या घरी आला. त्यांना जेवण्यासाठी काहीतरी करण्यास सांगतिले.
जिजाबाई यांनी भात करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी सुनील याने कपाटातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिजाबाई यांनी पहिले. त्यांनी विरोध केला असता सुनील याने त्यांना ठार मारले. तसेच दोरीने लटकावून ठेवले. हा प्रकार काही वेळाने उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा घेत होते.स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक श्री. पद्माकर घनवट व त्यांचे पथक आरोपीचा शोध घेत होते. घटनास्थळी चुलीवर भात शिजविण्यासाठी ठेवला होता. तो तसाच होता. त्यावरून कोणी तरी आले त्यामुळेच जिजाबाई यांनी भात ठेवला होता. त्यामुळे नातेवाईक किंवा कोणी ओळखीचे घरी आले असावे अशी शक्यता गृहीत धरून तपास सुरु केला.
यावेळी बंटीदारांमार्फत माहिती मिळाली की, खून सुनील याने केला आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली निरीक्षक घनवट व पथकातील पो.हवा. सुनिल जावळे, शरद बांबळे, सचिन गायकवाड, पो.ना.दिपक साबळे, गुरू जाधव, नितीन भोर, पो.कॉ.अक्षय नवले, समाधान नाईक नवरे यांनी सुनिल याला पकडले. चौकशीत त्याने पैशाची अडचण असल्यामुळे पैसे चोरण्याकरीता जिजाबाई भांगरे यांचे घरी गेल्याचे व पैसे चोरीत असताना जिजाबाई भांगरे यांनी पाहिले. यामुळे त्यांचा खुन केला असल्याचे सांगतिले.
Visit : bahujannama.com