मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अजित पवार यांनी आज ९ आमदारांच्या सोबत भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापनेची शपथ घेतली. त्या राष्ट्रवादीच्या ९ आमदारांची यादी समोर आली आहे. या ९ आमदारांना खास चार्टर्ड प्लेनने दिल्लीला पाठवण्यात आलेलं आहे. त्या विमानाच्या ऑपरेटरकडूनच ही यादी समोर समोर आली आहे.
दौलत दरोडा, नरहरी झिरवार, संजय बनसोडे, दिलीप बनकर, अनिल पाटील, नितीन पवार, सुनील शेळके, बाबासाहेब पाटील अशी या ९ आमदारांची नावं आहेत. दरम्यान, शरद पवार यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंबरोबर आज पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादीचे आमदार फुटलेले नाहीत, असं सांगितलं होतं.
राजभवनावर जे आमदार गेले होते, ते अंधारात होते, त्यांना काय घडणार याची कल्पना नसावी, असंही शरद पवार म्हणाले होते. सोबतच ज्या आमदारांनी पाठिंबा दिला आणि देणार आहेत त्यांना पक्षांतर करण्यात येईल अशी शरद पवार यांनी सांगितलं. आत चार्टर्ड फ्लाइटने दिल्लीला निघालेल्या आमदारांची यादी हाती आल्यामुळे आता नेमकं काय घडणार हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.
Visit : bahujannama.com