पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून आरोपीच्या राहत्या घरात घडला आहे.
याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुरज साळवे (रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो अॅक्ट) गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आणि आरोपीची एक वर्षापूर्वी ओळख झाली. त्यांच्यात मैत्री होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर आरोपीने पीडित मुलीला त्याच्या घरी बोलावून घेतले. ‘तू 18 वर्षांची झाल्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करतो’ असे आश्वासन देवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने वेळोवेळी पीडित मुलीला घरी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली. तिने 9 मार्च रोजी एका मुलाला जन्म दिल्याने हा प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपी सुरज साळवे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक साळुंखे करीत आहेत
Vijay Shivtare On Ajit Pawar | विजय शिवतारे यांचे अजितदादांवर पुन्हा शरसंधान