बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे शहरातून मुदतपूर्व बदल्या झालेल्या तीन पोलीस निरीक्षकाना (police inspectors)मॅट कोर्टाने दिलासा दिला असून, पुन्हा त्यांना पुण्यात पोस्टिंग दिली आहे. त्यांच्या राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांमध्ये पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांच्या बाहेर शहरात बदल्या केल्या होत्या.
पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, शंकर खटके आणि चंद्रकांत भोसले यांच्याबाबत मॅट कोर्टानं निकाल दिला आहे. गेल्या आठवड्यात राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश पोलीस महासंचालक कार्यलयाने काढले होते. त्यात मुदत संपलेली नसताना देखील या तीन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या पुण्यातून इतरत्र झाल्या होत्या. त्यात मनीषा झेंडे यांची सीपीआर, शंकर खटके यांची पुणे ग्रामीण तर भोसले यांनी बाहेर शहरात (ट्रेंनिग सेंटर) येथे बदली झाली होती.
अन्याय झालेल्या या अधिकाऱ्यांनी बदल्यांबाबत मॅट कोर्टात धाव घेत दाद मागितली होती. मॅट कोर्टाने आज याबाबत निकाल दिला असून, त्यांची पुन्हा पुण्यात नियुक्ती केली आहे. डिजी ऑफीसने यात नजर चुकीने या बदल्या झाल्या असल्याचे स्पष्टीकरणं न्यायालयात दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.