बहुजननामा ऑनलाइन – पुणे-बेंगलोर महामार्गावरील मोठ्या लॉजमध्ये सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा(illegal trade) गुन्हे शाखेने पर्दाफाश केला(illegal trade). येथून 2 मुलींची सुटका करत तिघांना अटक केली आहे.
जितेंद्र उर्फ जितू बाबासाहेब नंदिरे (वय 32, रा. काळेवाडी), रामकीसन व्यंकट जाधव (वय 35, जनता वसाहत) आणि एका 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अवैध धंद्यावर गुन्हे शाखा कारवाई करत आहे. तरीही छुप्या पद्धतीने अवैध प्रकार सुरू आहेत. याची माहिती काढत असताना पोलीस कर्मचारी संतोष भांडवलकर यांना बातमीदारामर्फत माहिती मिळाली की, वारजे माळवाडी परिसरात पुणे- बेंगलोर महामार्गावरील एका लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु आहे. त्यानुसार या माहितीची खातरजमा केली. त्यात उघड होताच येथील “साई एक्झिक्युटिव्ह” लॉजवर छापा टाकला. यावेळी येथून दोन भारतीय मुलींची सुटका करण्यात आली. तर एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त डॉ शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक वैशाली चांदगुडे, कर्मचारी संतोष भांडवलकर, आण्णा माने, अश्विनी केकान, हनुमंत कांबळे, संदीप कोळगे यांच्या पथकाने केली.