Yerawada Pune Crime News | पुणे : 4 टक्के मासिक परतावा देण्याचे आमिष, 10 जणांची 11 कोटी 40 लाखांची फसवणूक; इन्वेस्ट एन गेन कंपनीच्या संचालकांवर MPID

पुणे : – Yerawada Pune Crime News | कंपनीत 30 दिवसांसाठी गुंतवणुक केली तर त्यावर मासिक 4 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Good Returns) 10 जणांची 11 कोटी 40 लाख 45 हजार 058 रुपयांची आर्थिक फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी येरवडा येथील इन्वेस्ट एन गेन कंपनीच्या संचालकांसह तिघांवर येरवडा पोलिसांनी एमपीआयडी कायद्यांतर्गत (MPID Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जानेवारी 2023 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत प्लाटिनम स्केअर, साकोरी नगर, येरवडा येथे घडला आहे.
याबाबत प्रितम सुशील उपलप (वय-34 रा. हडपसर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्य़ाद दिली आहे यावरुन पोलिसांनी निखिल मिश्रा, इन्वेस्ट एन गेन कंपनीचे संचालक निखिल चढ्ढा, कंपनीचे चिफ बिझनेस ऑफिसर झुबीन गांधी यांच्या विरुद्ध आयपीसी 420, 406, 409, 34 सह सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम (MPID Act) कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या इन्वेस्ट एन गेन कंपनीमध्ये 30 दिवसांसाठी पैसे गुंतवले तर 4 टक्के मासिक परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्य़ादी यांनी वेळोवेळी आरोपीच्या कंपनीमध्ये आरटीजीएस द्वारे 2 कोटी 45 लाख 50 हजार व रोख 45 लाख 25 हजार रुपये गुंतवले. गुंतवलेल्या रक्कमेबाबत आरोपी आणि फिर्य़ादी यांच्या अँग्रीमेंट झाले. फिर्य़ादी यांनी गुंतवलेल्या एकूण 2 कोटी 90 लाख 75 हजार रुपयांपैकी 45 लाख 50 हजार रुपये फिर्यादी यांना परत केले.
उर्वरीत 2 कोटी 45 लाख 25 हजार रुपये परत घेण्यासाठी फिर्य़ादी यांनी आरोपींची भेट घेऊन पैशांची मागणी केली. तसेच त्यांना पत्र देऊन पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपींनी पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन फिर्यादी यांना पोस्ट डेटेड चेक दिले. फिर्य़ादी यांनी चेक वटवले असता ते बाउन्स झाले. त्यामुळे त्यांनी आरोपींना याबाबत सांगितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास टाळाटाळ केली. आरोपींनी फिर्य़ादी यांचे 2 कोटी 45 लाख 25 हजार व इतर 9 गुंतवणुकदारांचे 8 कोटी 95 लाख 20 हजार 058 असे एकूण 11 कोटी 40 लाख 45 हजार 058 रुपये परत न देता पैशांचा अपहार करुन फिर्यादी व इतर गुंतवणुकदारांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास करीत आहेत.
Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मतदानाला जाताच चोरट्यांनी घर फोडले, चोरटा 12 तासात गजाआड
Comments are closed.