Pune Hadapsar Crime | कोल्डड्रिंक मध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तरुणीवर बलात्कार, हडपसर परिसरातील प्रकार

Rape Case

पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Hadapsar Crime | कोल्डड्रिंक मध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तरुणीवर बलात्कार केला (Pune Rape Case). तसेच शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवतानाचे व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली (Obscene Video). हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 8 मार्च 2024 या कालावधीत हडपसर, अंबरनाथ व जत, सांगली येथील लॉजमध्ये घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) सांगली (Sangli) येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मुंबई येथील 22 तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्य़ाद दिली आहे. पीडित तरुणी मुंबई येथे राहते. पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन दऱ्याबा साऊबा साळे Dryaba Sauba Sale (रा. विठ्ठल नगर, जत, जि. सांगली) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 328, आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Pune Hadapsar Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी एका तालुक्यातील आहेत.
आरोपीने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिला हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन गेला.
कोल्डड्रिंक मध्ये गुंगीकारक पदार्थ टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर लॉजवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
तसेच शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ पीडित तरुणीला पाठवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, पीडित तरुणीने आरोपीशी संपर्क करणे कमी केले.
याचा राग आल्याने आरोपीने मुलीला शारीरिक संबंध ठेवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
तसेच पीडित तरुणीच्या आईला फोन करुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक मंगल मोढवे (PI Mangal Modhave) करीत आहेत.