Mahavikas Aghadi-Lok Sabha Election | महाविकास आघाडीचे जागा वाटप; बाळासाहेब आंबेडकर करणार बाळासाहेब थोरातांशी चर्चा

March 12, 2024

मुंबई: Mahavikas Aghadi-Lok Sabha Election | महाविकास आघाडीत काँग्रेस-शिवसेना यांच्यात किमान १० जागा, काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीत ५ जागांवर समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी वेळ लागतो आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi (VBA) मिळून भाजपा-आरएसएसला (BJP-RSS) उद्ध्वस्त करण्यासाठी पुढे जाऊ असा निर्धार व्यक्त करतानाच आंबेडकर यांनी आघाडीबाबत सकारात्मक आहे परंतु जागावाटपावरून होणारी दिरंगाई चिंतेचा विषय आहे. निवडणुकीसाठी कमी कालावधी, काँग्रेस-शिवसेना (Congress-Shivsena) यांच्यातील असमन्वय आणि महाविकास आघाडीत जागावाटप फॉर्म्युला अंतिम न होणे हे लक्षात घेत चिंता व्यक्त केली आहे.

 

आंबेडकर यांनी पत्रात म्हटले आहे की, आगामी लोकसभा निवडणूक या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. महाविकास आघाडीने आपापसात जागावाटपाचे समीकरण निश्चित केलेले नाही. मी ९ मार्च रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी संपर्क साधला. सविस्तर चर्चा केली तेव्हा शिवसेना कमीत कमी १८ जागा ज्या भाजपासोबत एकत्रित असताना त्यांनी जिंकल्या होत्या, त्या मागत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. चेन्नीथला यांची चिंता समजून मी वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्रित बसून ज्या जागा काँग्रेसच्या मनात आणि महाविकास आघाडीत मागणी केल्यात त्या सर्व जागांवर चर्चा करावी असा प्रस्ताव दिला. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) माझ्याशी संपर्क साधून प्रस्तावावर पुढे चर्चा करतील असे आश्वासन मला देण्यात आले. बाळासाहेब थोरात चर्चेसाठी तारीख आणि वेळ ठरवतील ही मला आशा आहे.

पुणे : स्वस्तात साखर देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला 45 लाखांचा गंडा, व्हीडीपी स्वाद फुडस प्रा. लि. कंपनीच्या दोन संचालकांना अटक