पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Ganeshotsav | गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव (Pune Ganeshotsav) मंदिरांमध्ये साजरा करण्यात येणार असून ज्या मंडळांकडे मंदिर नाही. त्यांना थोडा मंडप टाकण्यास परवानगी देण्यात येणार आहे. गतवर्षीप्रमाणे भाविकांना ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन शहर पोलिसांनी गणेश मंडळांना केले आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मंदिरामध्ये साजरा करुन आचारसंहितेनुसार गणेशोत्सव साजरा करण्यात येईल, असे आश्वासन मानाच्या गणपतीच्या पदाधिकार्यांनी पोलिसांना दिले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शहर पोलीस आणि मानाच्या गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची अनौपचारिक बैठक प्रथेप्रमाणे आज सायंकाळी पोलीस आयुक्तालयात झाली. यावेळी आठ मानाच्या गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी राज्य शासनाने यंदा तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती पदाधिकार्यांना देण्यात आली. तसेच पोलीस आणि गणेश मंडळ यांनी गतवर्षीप्रमाणे आचारसंहिता तयार करावी, असे या बैठकीत ठरविण्यात आले.
गतवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जाईल,
असे श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळ, अखिल मंडई गणपती मंडळाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले. ज्या मंडळांचे मंदिर आहे. त्यांनी मंदिरात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Web Title :- Pune Ganeshotsav | Ganeshotsav will be celebrated in the temple again this year
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BHR Scam | बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात सुनील झंवरला 10 दिवसांची दिवस कोठडी