पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Corona | पुणे शहरामध्ये (Pune City) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून शहरात नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची संख्या अधिक असून आज अडीचशेच्यावर रुग्ण आढळून आले आहेत. (Pune Corona) पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 259 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 256 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरात आजपर्यंत 4 लाख 89 हजार 506 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 78 हजार 629 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात शहरातील 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे शहरात 8828 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
शहरात 2049 अॅक्टिव्ह रुग्ण
आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 9,990 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत पुण्यामध्ये 29 लाख 67 हजार 796 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरामध्ये सध्या 2049 रुग्ण अॅक्टिव्ह (active patient) आहेत. त्यापैकी 204 रुग्ण गंभीर आहेत. तर 329 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Web Title :- Pune Corona | pune coronavirus news updates today
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
BHR Scam | बीएचआर पतसंस्था अपहार व फसवणूक प्रकरणात सुनील झंवरला 10 दिवसांची दिवस कोठडी