पुणे : बहुजननामा ऑनलाइन – लष्कराची बनावट वेबसाईट (Fake Website) तयारकरून चार तरुणांना लष्करात नोकरी लावण्याच्या आमिषाने साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी भारत कृष्णा काटे (वय 41), राजेंद्र दिनकर संकपाळ, दयानंद जाधव आणि बी के सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सलमान गौसउद्दीन शेख (वय 21, करडखेर गाव, लव्हारा, उदगीर, लातूर) या तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लष्कराची वेबसाईट तयार केली होती. त्यांनी फिर्यादी तरुण व आणखी दोघांना लष्करात नोकरी लावतो, असे सांगून प्रत्येकी 6 लाख रुपयांची मागणी केली. तर फिर्यादीचा भाऊ सोहेल शेख याला रेल्वेत तिकीट चेकर म्हणून भरती करण्यासाठी सात लाख रुपये मागितले होते.
तरुणाचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ऐकून 13 लाख 50 हजार रुपये उकळले. त्यांना दिल्ली, झांसी, रांची, लखनऊ, जबलपूर याठिकाणी वेगवेगळी कारणे काढून बोलावले. त्यानंतर त्यांना भारतीय लष्कराचे बनावट नियुक्तीपत्र दिले. मात्र काहीच दिवसात हा प्रकार समोर आला. तरुणांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानुसार या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.
बाबा रामदेव यांचा अॅलोपॅथीनंतर आता ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…
रुचिरा जाधवच्या ‘या’ ग्लॅमरस फोटोंवर व्हाल फिदा
खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय ?
राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘राजकारणात काहीही घडू शकतं’