मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेत अभिनेत्री रुचिरा जाधवने (ruchira jadhav) मायाची भूमिका उत्तम साकारली होती. ती सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. आपले हटके फोटो आपल्या चाहत्यांसोबत ती शेअर करत असते. अभिनेत्री रुचिरा जाधव (ruchira jadhav) हिच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
रूचिराने सोशल मीडियावर समुद्र किना-यावरचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने केलेल्या या फोटोशूटमध्ये रूचिरा ग्लॅमरस पोज देताना दिसतेय.
केशरी रंगाचा तिचा ड्रेस आणि तिच्या अदांनी चाहत्यांना जणू वेड लावले आहे.
साहजिकच तिचे हे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.
‘बंच ऑफ रेड रोजेस’ हे नाटक आणि ‘लव्ह लफडे’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे.
तसेच ‘बेदुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’, ‘तुज्यावाचून करमेना’ या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’ या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.
खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय ?
राज ठाकरेंच्या विधानावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘राजकारणात काहीही घडू शकतं’