पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयामध्ये उप सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याबाबतच आदेश आज (मंगळवार) केंद्र सरकारकडून काढण्यात आले आहे.
नवल किशोर राम हे सन 2008 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पुण्यात ते जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळत त्यांनी गतवर्षी पुरपरिस्थती व्यवस्थितरित्या हाताळली. दरम्यान, कोरोना व्हायरसचं संकट आलं. गेल्या काही महिन्यांपासून नवल किशोर राम आणि इतर प्रशासकीय अधिकारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवसरात्र एक करून काम करीत आहेत. केंद्र सरकारने नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उप सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे आदेश आजच काढण्यात आले आहेत.
दरम्यान, नवल किशोर राम हे नियमानुसार 3 आठवडयाच्या आत पंतप्रधान कार्यालयात उप सचिव म्हणून पदभार स्विकारतील.