पुणे : Pune Dattanagar Double Murder Case | पुण्याच्या कात्रज परिसराजवळील दत्तनगरमध्ये (Katraj Datta Nagar) दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नी आणि मुलीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, खून करणारा स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाल्याची माहिती समोर आली आहे.(Pune Dattanagar Double Murder Case)
चाकूने वार करून आणि उशीने तोंड दाबून खून करण्यात आला आहे. श्वेता तळेवाले (40), शिरोली तळेवाले (16) अशी खून झालेल्या आई आणि मुलीची नावे आहे तर अजय तळेवाले (45) असे खून करणार्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि अजय यांच्यात वेळावेळी भांडण-तंटा होत होता.
आर्थिक वादातून त्यांच्यामध्ये भांडणे व्हायची. शुक्रवारी रात्री देखील पती-पत्नीमध्ये वाद झाले. पत्नी रागात म्हणाली, मी माहेरी निघून जाईल. त्यानंतर त्या रागाच्या भरात झोपल्या. त्यानंतर पतीने झोपलेल्या पत्नीची हाताची नस कापली आणि त्यानंतर उशीने तोंड दाबून तिचा खून केला. नेहमी आईची बाजु घेणार्या मुलीचा देखील अजयने तिच्या तोंडावर उशी दाबून खून केला आहे.
अजय तळेवाले हे फायनान्सची कामे करतो. ग्राहकांना कर्ज मिळवून देण्याचे तो काम करतो असे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Pune Lashkar Crime News | पुणे : अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग, स्कूल व्हॅन चालकाला अटक