Pune Cyber Crime | धक्कादायक ! फेसबुकवर 56 वर्षाच्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनाम; तिच्या दुसर्या पतीनं पाठविले जावयाला अश्लिल फोटो

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Cyber Crime | तरुण तरुणीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट (Fake Account On Social Media) काढून त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे, त्यांचे अश्लिल फोटो (Pornographic Photos) अपलोड करुन त्यांची बदनामी (Defamation) करण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. पण एका 56 वर्षाच्या महिलेचा बनावट फेसबुक अकाऊंट (Fake Facebook Account) तयार करुन त्यावरुन अश्लिल मेसेज प्रसारित करुन तिचे बदनामीकारक फोटो अपलोड करण्याचा प्रकार समोर आला. (Pune Cyber Crime)
सायबर पोलिसांनी (Pune Cyber Police) तपास केल्यावर हे सर्व कृत्य चक्क तिच्या दुसर्या पतीने केलेले उघडकीस आले आहे. यावरुन चंदननगर पोलिसांनी (Chandan Nagar Police) बनावट अकाऊंट तयार करणार्याबरोबरच तिचा पती बरुन भावेश करमाकर (रा. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Cyber Crime)
याबाबत खराडी (Kharadi) येथे राहणार्या एका 56 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. हा प्रकार एक महिन्यांपूर्वी ते 2 मार्च दरम्यान घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. त्या फेसबुक अकाऊंटवर त्याने फिर्यादीच्या नावाने मी घटस्फोटीता (Divorce) आहे. मला मसाज करणार्याची गरज असे, असे प्रकारचे अश्लिल मेसेज प्रसारित केले.
सोबत फिर्यादीचा email आयडी प्रसारित केला.
त्यामुळे फिर्यादी यांना वेगवेगळ्या लोकांचे ई – मेल येऊ लागले. त्याच्या जोडीने त्याने त्यांचे व त्यांच्या मुलीचे अश्लिल फोटो प्रसारित केले. तसेच त्यांच्या जावयाच्या मोबाईलवर हे फोटो पाठवून त्यांची बदनामी केली. या महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यात हे कृत्य त्यांचा दुसरा पती बरुन करमाकर याने केलेल्याचे उघड झाले. सध्या तो दार्जिलिंगला राहत आहे. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे (Police Inspector Sunil Thopte) तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Cyber Crime | Shocking Notorious for posting offensive photos of 56 year old woman on Facebook Pornographic photos to be sent by her second husband
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Sanjay Raut | गोव्यातील रश्मी शुक्ला कोण ? खा. संजय राऊत यांचे भाजपवर जोरदार शिरसंधान
Slim Waist Exercises | कमरेवर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी खुप प्रभावी आहेत ‘या’ 3 एक्सरसाईज
Comments are closed.