मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Sanjay Raut | दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सरकार स्थापन होण्याच्या वेळी भाजपने (BJP) पोलीस अधिकार्यांना हाताशी धरुन आमदारांचे फोन टॅपिंग (MLA Phone Tapping) केले होते, तोच प्रकार आता गोव्यात (Goa) सुरु असून गोव्यातील रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) कोण आहेत, असा सवाल उपस्थित करीत खासदार आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) भाजपवर शिरसंधान केले आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, गोव्यातील मतदान पार पडले आहे. आता १० मार्च रोजी निकाल लागेल. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तेथील नेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी कालच आपला फोन टॅप (Phone Tapping in Goa) केला जात असल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणाचा देशभरात गैरवापर सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून माझाही फोन टॅप केला जात आहे. मात्र, मी त्यांना घाबरणारा नाही़ मी माझा फोन बदलला नाही.
The way phones of Maharashtra leaders were tapped,same Pattern of Phone surveillance is being replicatd in Goa. Calls of @SudinDhavalikar, @VijaiSardesai @digambarkamat & @girishgoa are being tapped.
Nation wants to know : Who is the 'Rashmi Shukla' of Goa behind this tapping?
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 5, 2022
देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आली आहे. आपल्या विरोधकाना संपविण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले आहे.
अमली पदार्थ विक्री व्यवसायातील गुन्हेगार असल्याचे सांगून बेकायदेशीरपणे व राजकीय हेतूने पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे ६० दिवस टेलिफोन टॅपिंग केले होते. त्यावरुन तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (DGP Sanjay Pandey) यांच्या समितीने दिलेल्या अहवालानुसार पोलिसांनी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रश्मी शुक्ला (IPS Rashmi Shukla) यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली असून त्यांच्यावर २५ मार्चपर्यंत कठोर कारवाई न करण्याचा आदेश न्यायालयाने (Bombay High Court) दिला आहे.
मागील निवडणुकीत गोव्यात काँग्रेस पक्ष (Goa Congress) सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. मात्र, भाजपने (Goa BJP) फोडाफोडी करुन रात्रीतून सत्ता मिळविली होती.
त्यामुळे यावेळीही भाजप अशा प्रकारे फोडाफोडी करण्यासाठी संभाव्य निवडून येणार्या आमदारांचे फोन टॅपिंग करीत असल्याचे आरोप होत आहे.
Web Title :- Sanjay Raut | sanjay raut tweet phone tapping of digambar kamat is going on in goa
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Slim Waist Exercises | कमरेवर जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी खुप प्रभावी आहेत ‘या’ 3 एक्सरसाईज
Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी