पुणे : बहुजननामा ऑनलाइन- Pune Crime | राजगुरुनगरमध्ये जुन्या भांडणाच्या राग मनात धरुन कुख्यात गुंड पप्पु ऊर्फ राहुल कल्याण वाडेकर (Pappu Wadekar) याचा निर्घुण खुन (murder ) करणार्या प्रकरणाचा उलगडा झाला असून ग्रामीण पोलिसांनी (Rural Police) दोघांना अटक (Arrest) केली आहे. जितेंद्र पंढरीनाथ गोपाळे (वय ३१, रा. तिन्हेवाडी रोड, जयगणेश दर्पण सोसायटी, राजगुरुनगर, ता. खेड) आणि बंटी ऊर्फ विजय जगदाळे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. मिलिंद विठ्ठल जगदाळे, मयूर विठ्ठल जगदाळे, सचिन शांताराम पाटणे, प्रविण ऊर्फ मारुती थिगळे, तौसिफ शेख (रा. खेड) अशी इतर गुन्हा (FIR) दाखल झालेल्यांची नावे आहेत.
राहुल ऊर्फ पप्पू कल्याण वाडेकर (वय २८, रा. राजगुरुनगर, तडीपारीनंतर वाजेवाडी, शिरुर) याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी असे विविध कलमांखाली ९ गुन्हे दाखल आहेत. राजगुरुनगरचे माजी उपसरपंच सचिन ऊर्फ पपा भंडलकर (Former Deputy Sarpanch Sachin Bhandalkar) यांचा केदारेश्वर मंदिर परिसरात २०११ मध्ये खुन केला होता. पप्पू वाडेकर याला तडीपार करण्यात आले होते.
राजगुरुनगर शहरात वर्चस्वावादामुळे त्याचे मिलिंद जगदाळे व टोळीशी काही महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. सोमवारी पहाटे होलेवाडी परिसरात पप्पु वाडेकर आला असल्याची माहिती जगदाळे टोळीला मिळाली. त्यानंतर जगदाळे टोळीने त्याच्यावर गोळीबार करुन जखमी केले. त्यानंतर दगडाने चेहरा ठेचून त्याचा खुन करुन पळून गेले. पप्पुचा भाऊ अतुल कल्याण वाडेकर यांने याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात (Khed Police Thane) फिर्याद दिली. त्यानुसार ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (Crime Investigation Branch) तपास पथक राजगुरुनगर परिसरात तपास करीत असताना पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट (Police Inspector Padyakar Ghanwat) यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी बंटी जगदाळे हा पुण्याकडे पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार राजगुरुनगर (Rajgurunagar) शहरातून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर जितेद्र गोपाळे हा बरोबर असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी जितेंद्र गोपाळे याला ताब्यात घेतले असून दोघांना अधिक तपासासाठी खेड पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, (Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh) अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील,
(Superintendent of Police Vivek Patil) उपविभागीय अधिकारी लंभाते (Sub-Divisional Officer Lambate) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट,
सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, नेताजी गंधारे, सहायक फौजदार राजेंद्र थोरात, हवालदार विक्रम तापकीर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, जनार्धन शेळके,
राजू मोमीन, दीपक साबळे, सचिन गायकवाड, पोलीस नाईक मंगेश थिगळे, अजित भुजबळ, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर, राजापुरे यांनी केली.
web title: Pune Crime | The reason for the murder of Tadipar goon Pappu Wadekar is clear; Two arrested by Pune Rural Police.
WhatsApp | WhatsApp मध्ये येत आहेत ‘ही’ 3 अतिशय खास फिचर्स, बदलेल चॅटिंगचा अनुभव; जाणून घ्या
Pune Crime News | खडकी परिसरात दोन इराणी गटात तुंबळ हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल