पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुण्यातील एका नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (Science Research Institute) असलेल्या एका महिला शौचालयात (Toilet) मोबाईलद्वारे शूटिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जाता आहे. याबाबत (Pune Crime) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत 26 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.14) चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध आयपीसी 354क नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला आहे. (Pune Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पुण्यातील नामांकित सायन्स रिसर्च इन्स्टिट्यूटच्या शौचालयात
घडली आहे. फिर्यादी पीडित महिला शौचालय वापरत असताना त्यांच्या बाजुच्या शौचालयातील अज्ञात व्यक्तीने शौचालयाच्या खालच्या बाजूने त्याचा मोबाईल धरला आणि पीडित महिला शौचालयाचा वापर करत असतानाचे चित्रीकरण केले. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक शानमे (API Shanme) करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Shocking! Shooting by mobile in women’s toilet, type from reputed science research institute, Pune
हे देखील वाचा :
Taapsee Pannu | तापसी पन्नू झळकणार शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटात; 2023 मध्ये होणार प्रदर्शित
Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन
Vivek Oberoi | बॉलिवूडवर अभिनेता विवेक ओबेरॉयने केले मोठे विधान; “त्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त…”