बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री तापसी (Taapsee Pannu) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. तर आता ती लवकरच किंग खान अर्थातच शाहरुख खान बरोबर रोमान्स करताना दिसणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
एका मुलाखतीत तापसीने सांगितले की, “राजू सरांचे चित्रपट मला खूपच आवडतात. त्यांचे जग अगदी निराळे आहे. त्यांच्या सेटवर कोणी मजा करत नसेल यात नवल”. यावर तिला शाहरुख खान बरोबर रोमान्स करताना दिसणार का? असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली, “जर मला शाहरुख खान बरोबर रोमान्स करायला मिळाला तर मी ते उत्तम रित्या करेन, आणखीन काय हवंय?” अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
तापसी पन्नू (Taapsee Pannu) पहिल्यांदाच शाहरुख खान बरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
तापसी आणि शाहरुख खान ‘डंकी’ या चित्रपटामध्ये एकत्रित दिसणार आहेत.
त्यासाठी प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
तापसीचा ‘ब्लर’ हा चित्रपट झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटातून तापसी प्रथमच निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
याआधी तापसीचा ‘दोबारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला होता.
तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Taapsee Pannu | bollywood actress tapsee pannu is roamncing in shahrukh khans dunky
हे देखील वाचा :
Parag Bedekar Passes Away | मनोरंजनसृष्टीवर शोककळा; अभिनेते पराग बेडेकर यांचं निधन
Vivek Oberoi | बॉलिवूडवर अभिनेता विवेक ओबेरॉयने केले मोठे विधान; “त्यांनी माझं करिअर उद्ध्वस्त…”