पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – पुणे शहरातील (Pune Crime) दत्तवाडीत सामुहिक बलात्काराचे (Dattawadi, Gang Rape Case) प्रकरण समोर आल्यानंतर पुण्यासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आता पिंपरीत एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याने पुन्हा एकदा पुणे (Pune Crime) हादरले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री चिंचवड परिसरात उघडकीस आली.
मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास बंद पडलेल्या बांधकाम साईटवर अल्पवयीन मुलीला नेऊन तीन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला.
यावेळी आरोपींनी मुलीला कुठेही वाच्यता केल्यास तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.
तसेच दुष्कृत्य करतानाचा व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली.
या घटनेने पिंपरी-चिंचवड शहर हादरले आहे. गुन्ह्यातील 2 आरोपी सराईत असून त्यांच्यावर यापूर्वी खून, चोरी, जबरी चोरी, घरात घुसून विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या सामुहिक अत्याचाराच्या घटनेची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने चिंचवड पोलिस ठाण्यात नोंदवल्यानंतर तीन अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात.
पीडित मुलगी प्रचंड घाबरलेली असल्याने तक्रार देण्यास तयार नव्हती.
पोलिसांनी तिला धीर दिल्यानंतर तिने तक्रार दाखल केली.
यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहे.
Web Title : Pune Crime | Shocking Incident of gang rape in Chinchwad followed by Pune victim girl minor
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update