पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | हडपसर येथे सुमारे तीन किलो ५०० ग्रॅम गांजा बेकायदा बाळगल्याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. राणी पिराजी सूर्यवंशी (वय ३०, रा. हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. तिच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (एनडीपीएस) हडपसर पोलिस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तिच्याकडून ३५ हजार रुपये किमतीच्या गांजासह २१ हजार रुपये किमतीच्या विदेशी मद्याच्या बाटल्या असा एकूण ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, तिच्याविरोधात यापूर्वी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपीने गांजा कोणाकडून आणला, कोणाला विकला, याचा शोध घेण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव (Assistant Public Prosecutor Vijay Singh Jadhav) यांनी केली.
Web Title : pune crime woman arrested for possession of cannabis hadapsar police station
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime | धक्कादायक ! पुण्यापाठोपाठ चिंचवडमध्ये सामूहिक अत्याचाराची घटना, पीडित मुलगी अल्पवयीन