पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन (Threats To Make Objectionable Photos Viral) तसेच लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) वारंवार लैंगिक अत्याचार (Rape In Pune) करणार्यास विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police) अटक केली आहे. (Pune Crime)
सिद्धार्थ सुरेशकुमार शर्मा Siddharth Sureshkumar Sharma (वय १९, रा. इंद्रलोक सोसायटी, ताडीवाला रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. ही घटना नारायण पेठ (Narayan Peth, Pune) व कल्याणीनगर (Kalyani Nagar, Pune) येथील राधा कॉटेज येथे सप्टेंबर २०२१ ते २४ मार्च २०२२ दरम्यान घडली. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची १६ वर्षाची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही सिद्धार्थ शर्मा याने तिला जबरदस्तीने तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून तिला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relation) केले. ही बाब फिर्यादी यांना माहिती झाल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक शेडगे तपास करीत आहेत.
Web Title :- pune crime rape of a minor girl in pune for threatening to make a photo viral vishrambag police arrest siddharth sureshkumar sharma of indralok society tadiwala road pune
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव