पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | वॉर्डन म्हणून काम करीत असताना झालेल्या ओळखीतून मोबाईल नंबर घेऊन एका ट्रॅफिक वॉर्डनने (Traffic Warden Pune) महिला पोलीस शिपायास (Lady Police) अश्लिल मेसेज (Pornographic Messages) करुन विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी (Koregaon Park Police) दीपक राऊत (Deepak Raut) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ हा प्रकार ऑगस्ट २०२१ ते आतापर्यंत घडला आहे (Pune Crime).
याबाबत वाहतूक शाखेत (Pune Traffic Police) काम करणार्या एका २५ वर्षाच्या महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. वाहतूक विभागात काम करीत असताना अनेकदा एकत्रितपणे वाहतूक नियमनाचे काम करावे लागते. (Pune Crime)
त्यातून त्यांची दीपक राऊत या ट्रॅफिक वॉर्डन म्हणून काम करणार्याशी ओळख झाली होती.
त्याने फिर्यादी यांचा मोबाईल नंबर घेतला होता. दीपक राऊत याला २०२१ नंतर वॉर्डन म्हणून कामावरुन मुक्त करण्यात आले. असे असताना तो वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन फोन करुन शिवीगाळ करीत. तसेच त्यांना अश्लिल मेसेज करुन त्रास देत होता. त्यांनी अनेकदा समाजावून सांगितल्यानंतरही त्याचा हा त्रास कमी न झाल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Pune police Traffic warden sends obscene message to 25 year old female police officer in Pune Something happened next
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Crime News | पगार मागितल्याने अधिकाऱ्याकडून 43 वर्षीय महिलेचा विनयभंग
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा लेटेस्ट भाव