राजगुरुनगर : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे-नाशिक महामार्गावर (Pune-Nashik Highway) उभ्या केलेल्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून पावणेतीन लाखांची रोकड लंपास (Cash stolen) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) राजगुरुनगर (Rajgurunagar) येथे घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे.
याप्रकरणी पिकअप चालक अर्जुन लक्ष्मण सावंत (रा. भोमाळे ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात (Khed police station) फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी सावंत यांच्या पिकअप गाडीचा दरवाजा उचकटून 2 लाख 86 हजार रुपयांची रोकड लंपास (Pune Crime) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सावंत हे पिकअप गाडीवर चालक म्हणून काम करतात. गाडीमध्ये किराणा माल भरून डेहणे, वाडा, खेड येथील दुकानदारांना देण्यासाठी आले होते. दुकानदारांकडून गोळा केलेले पैसे त्यांनी गाडीच्या डिकीत ठेवले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मंगळवारी (दि. 14) दुपारी तीनच्या सुरमास राजगुरुनगर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर पुणे-नाशिक महामार्गालगत पिकअप गाडी उभी करुन धनश्री चौकातील (Dhanashree Chowk) एका हॉटेलमध्ये बाथरुमसाठी गेले होते. चोरट्यांनी 10 मिनिटात गाडीच्या दरवाजाचे लॉक तोडून डिकीत ठेवलेले 2 लाख 86 हजारांची रोकड लंपास केली. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Rajgurunagar Pune Nashik Highway Khed police station crime news
OBC Reservation Maharashtra | सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर ठाकरे सरकारनं घेतला मोठा निर्णय