पुणे : बहुजननामा ऑनलाइन– Pune Crime | कॅनॉलमध्ये ढकलून देत साडेतीन तोळ्याच्या दोन सोन्याच्या चैन (Gold Chain) चोरुन नेल्याचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात (Alankar Police Station) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. ही घटना 21 जून रोजी कर्वेरोड कॅनॉल लगत असलेल्या रस्त्यावर (Pune Crime) घडली होती.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनिल नामदेव सातपुते Anil Namdev Satpute (वय-32 रा. कोथरुड), आंकेत राजेश कडू Anket Rajesh Kadu (वय-29 रा. कामना वसाहत, कर्वेनगर) अशी अटक करण्यात (Pune Crime) आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस (Pune Police) अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या (Robbery) गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी हा गुन्हा कोथरुड येथील आरोपीने साथीदाराच्या मदतीने केला असून ते चोरीचे सोन्याचे दागिने विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कोथरुड येथील हनुमाननगर येथील विठ्ठल मंदिराजवळ सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून अलंकार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील (PSI Ajit Kumar Patil), पोलीस अंमलदार संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, सुजित पवार, संजीव कंबळे, प्रताप पडवाळ, राकेश टेकावडे, ज्ञानेश्वर चित्ते, सतिश कत्राळे, साईनाथ पाटील, दिपक क्षिरसागर, सतिश कत्रांळे, गणेश शिंदे, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्या पथकाने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests two burglars, seizes Rs 1.5 lakh
हे देखील वाचा :