बहुजननामा ऑनलाइन – Swarajya Sanghatana | राज्यसभेचे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या (Swarajya Sanghatana) अधिकृत प्रवक्ते पदी डॉ. धनंजय राजाराम जाधव (Dr. Dhananjay Rajaram Jadhav) आणि करण पंढरीनाथ गायकर (Karan Pandharinath Gaykar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आणि स्वराज्य संघटनेची स्थापना केली. विस्थापितांना न्याय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आदर्शांवर चालत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला संघटित करण्यासाठी “स्वराज्य” संघटनेची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ. धनंजय जाधव आणि करण गायकर यांनी मराठा आरक्षण, अनेक सामाजिक आंदोलने व न्यायालयाच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. त्याचबरोबर समाजातील वंचित व सोशिक घटकांसाठी ते मागील 14 वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.
Web Title :- Swarajya Sanghatana | Appointment As the spokesperson of Chhatrapati Sambhaji Raje’s Swarajya Sanghatana, Dr. Dhananjay Jadhav and Karan Gaikar
हे देखील वाचा :
Nia Sharma Hot Look | निया शर्माच्या हॉट अंदाजानं चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका..
Nikki Tamboli Viral News | निक्की तांबोळी झाली कोरोना पॉझिटिव्ह, पोस्ट शेअर करून म्हणाली…