पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Crime | पुणे शहरात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका परप्रांतीय तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एकने सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून गांजा, दुचाकी, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 2 लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई (Pune Crime) कोथरुड येथील कर्वे पुतळ्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर सोमवारी (दि.28) केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
करणकुमार भरत राय (वय-22 रा. गुरुदत्त कॉलनी, कर्वेनगर, पुणे मुळ रा. थाना डुमरा, गाव रसदपुर, जि. सितामडी, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)
अंमली पदार्थ विरोधी पथक एकचे अधिकारी व कर्मचारी अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी कर्वे पुतळ्याकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर दुचाकीवर एक तरुण संशयितरित्या उभा असलेला आढळून आला. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्या दुचाकीच्या मध्यभागी असलेल्या पोत्याची झडती घेतली असता 1 लाख 51 हजार 400 रुपयांचा 7 किलो 570 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा, दुचाकी, मोबाईल, एक इलेट्रॉनिक वजन काटा असा एकूण 2 लाख 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलस आयुक्त रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक शैलजा जानकर,
पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, राहुल जोशी,
संदिप शिर्के, विशाल दळवी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, योगेश मोहिते, रेहना शेख यांच्या पथकाने केली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch arrested a youth who came to Pune city to sell ganja, seized valuables worth two lakhs
हे देखील वाचा :