बहुजननामा ऑनलाईन – Riteish Deshmukh Ved | नुकताच अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. चित्रपटांमधील रितेश आणि जेनेलियाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. तर पहिल्यांदाच मराठी चित्रपटात रितेश देशमुख आणि जेनेलिया एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. तर आता या चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. (Riteish Deshmukh Ved)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या गाण्यात रितेश देशमुख आणि अभिनेत्री जीया शंकर दिसत आहेत. तर या गाण्यात दोघांमधील रोमान्स समुद्रकिनारी चित्रित करण्यात आले आहे. गाण्यातून रितेश देशमुख आणि जिया शंकर यांच्यातले प्रेम फुलताना दिसत आहे. तर या गाण्याला लोकप्रिय जोडी अजय अतुल यांनी संगीत दिले आहे.“वेड तुझा विरह वणवा” असे या गाण्याचे बोल आहेत. तर सध्या अजय अतुल यांच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहे.
रितेश देशमुख ने हे गाणं सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की “प्रेमाचा अर्थ तेव्हाच कळतो जेव्हा तुम्ही
त्यातला वेडेपणा अनुभवता सादर करतो आहे आमच्या सिनेमातलं पहिलं गाणं ‘वेड तुझा’
You call it Love, we call it Madness!” या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः अभिनेते रितेश देशमुख यांनी केले असून जेनेलिया या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर देखील दिसणार आहेत. तर हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Riteish Deshmukh Ved | riteish deshmukh shared video of first song from his upcoming film ved
हे देखील वाचा :
Maharashtra Police Recruitment | राज्य सरकारची मोठी घोषणा, पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली