Pune Crime | नियंत्रण सुटल्याने डंपर खड्ड्यात कोसळून चालकाचा मृत्यु

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | मेट्रोच्या (Pune Metro) कामातील निघालेला राडारोडा दुसरीकडे टाकण्यासाठी जात असताना चढावर चालकाचा डंपरवरील ताबा सुटला (Pune Accident News). डंपर उलटा मागे येऊन खड्ड्यात पडल्याने त्याखाली सापडून चालकाचा मृत्यु झाला. (Pune Crime)
सुभाष तुळशीराम माने Subhas Tulshiram Mane (वय ४६, रा. थेरगाव) असे मृत्यु पावलेल्या चालकाचे नाव आहे. हा प्रकार मांगडेवाडी (Mangdewadi) येथील सुनिल मांगडे यांच्या जागेत बुधवारी सायंकाळी ५ वाजता घडला. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पोलीस शिपाई किरण साबळे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. सुभाष माने हे सॅमन इन्फ्रा कॉर्प बाणेर या कंपनीत चालक म्हणून कामाला होते. कंपनी सध्या मेट्रोचे खोदकाम करीत आहे. स्वारगेट (Swargate) येथील खोदकामातून निघालेले राडारोडा डंपरमध्ये भरुन तो घेऊन ते मांगडेवाडी येथे जात होते. शैलेंद्र पुजारी हा क्लिनर त्यांच्या बरोबर होता. हा डंपर वर चढत असताना चालक माने यांचा डंपरवरील ताबा सुटला व डंपर मागे मागे येऊ लागला. तेव्हा क्लिनर शैलेंद्र पुजारी याने डंपरमधून बाहेर उडी मारली. मात्र, माने यांना बाहेर पडता न आल्याने ते डंपरबरोबरच खाली खड्ड्यात पडले. त्यात त्यांच्या डोक्याला मार लागून माने यांचा मृत्यु झाला.
Web Title : – Pune Crime | Pune Accident News Bharti Vidyapeeth Police Station Limits
हे देखील वाचा :
Sanjay Raut | संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ED च्या तपासात उघड
Ajit Pawar | शिंदे सरकारवर नामुष्की? मंत्री अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यात असमर्थ
Comments are closed.