पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime | सातारा रोडवरील कात्रज (Satara Road, Katraj) येथील चौघुले इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला थांबून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या (Pune Police Crime Branch Unit 2) पथकाने पकडले. त्यांच्याकडून पिस्तुल (Pistol), लोखंडी रॉड जप्त केले आहेत. (Pune Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आबा ऊर्फ ज्ञानेश्वर फुलचंद तांदळे Aba alias Dnyaneshwar Phulchand Rice (वय २८), आदित्य गणपत राठोड Aditya Ganpat Rathore (वय १९) आणि संजय रामचंद्र प्रसाद ऊर्फ साह Sanjay Ramchandra Prasad alias Saha (वय ४०) अशी अटक (Arrest) केलेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस हवालदार नामदेव रेणुसे (Police Constable Namdev Renuse) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७०७/२२) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, गुन्हे शाखेचे युनिट २ चे पथक मंगळवारी सायंकाळी कात्रज परिसरात
गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना चौघुले इंडस्ट्रीजकडे (Chowghule Industries) जाणार्या रोडवर वडाच्या
झाडाच्या आडोशाला संशयस्पदरित्या तिघे जण थांबलेले आढळून आले. त्यांनी तिघांना पकडून त्यांची झडती घेतली.
त्यात त्यांच्याकडे एक पिस्तुल, लोखंडी रॉड मिळाला. त्याचबरोबर २ मोटारसायकली, २ मोबाईल,
रोख रक्कम असा १ लाख २६ हजार ६६० रुपयांचा माल जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोसले
(Assistant Police Inspector Bhosale) अधिक तपास करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Crime | Pistol, rod seized from robbers who were preparing for robbery
हे देखील वाचा :
Pune Crime | अफूची विक्री करणाऱ्याला अटक, चंदननगर परिसरात कारवाई