मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगचा (Phone Tapping Case) आरोप असलेल्या पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त (Pune Former CP) रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांना नुकतीच क्लिन चीट मिळाली आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) यांच्यावर करण्यात आल्याने त्या अडचणीत आल्या होत्यात. यानंतर आता पुढील आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना महासंचालक (Director General of Police) म्हणून नियुक्त केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती भाजपच्या (BJP) एका मंत्र्याने मंगळवारी दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्या सध्या हैदराबादमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक (SRPF Addl DG) म्हणून नियुक्त आहेत. डीजी हेमंत नगराळे (DG Hemant Nagarle) यांच्यानंतर त्या राज्यातील सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. त्या राज्याचे डीजीपी आयपीएस (DGP IPS) अधिकारी रजनीश शेठ (Rajnish Sheth) यांच्या वरिष्ठ आहेत. रश्मी शुक्ला (IPS Officer Rashmi Shukla) या जून 2024 मध्ये निवृत्त होणार आहेत.
राज्य सरकारने दिलासा दिल्यानंतर त्यांनी केंद्रात पोलीस महासंचालकपदी पात्र ठराव्यात यासाठी प्रयत्न सुरु केले
आहेत. केंद्रात पोलीस महासंचालकपदाकरिता पात्र ठरल्यावर त्यांचा राज्याच्या सेवेत पोलीस महासंचालकपदी येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.
महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात
शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्या महासंचालक पदावर पात्र ठरल्या नव्हत्या.
रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त (Mumbai CP) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या
महासंचालकपदी (ACB DG) नियुक्ती करण्यात येऊ शकते, अशी माहिती एका भाजप नेत्याने दिली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- IPS Officer Rashmi Shukla | rashmi shukla soon be maharashtra dgp or mumbai cp in the state
हे देखील वाचा :
Pune Crime | दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांकडून पिस्तुल, रॉड जप्त
Pune Crime | अफूची विक्री करणाऱ्याला अटक, चंदननगर परिसरात कारवाई