पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | बाहेर जात असताना पाऊस आल्याने आडोश्याला उभे राहिले असताना कम्पाऊंडच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का (Electric Shock) बसून त्यात एका तरुणाचा मृत्यु (Death) झाला. (Pune Crime News)
अजयकुमार विनोदकुमार वर्मा Ajay Kumar Vinod Kumar Verma (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा – Shivnerinagar, Kondhwa) असे या तरुणाचे नाव आहे. ही घटना कोंढव्यातील ब्रम्हा इस्टेट सोसायटीतचे (Brahma Estate Society Kondhwa) तारेच्या कम्पाऊंडशेजारी गुरुवारी रात्री पावणे आठ वाजता घडली.
याबाबत त्यांचे वडिल विनोदकुमार फिरारीराम वर्मा (वय ५०, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४०/२३) दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार विनोदकुमार वर्मा हे कामानिमित्त बाहेर गेले होते. ब्रम्हा इस्टेट सोसायटीजवळून जात असताना जोराचा पाऊस आल्याने ते स्वत:चा बचाव करण्यासाठी सोसायटीच्या कम्पाऊंडलगत आडोश्याला जाऊन थांबले. त्यावेळी त्यांचा हात कंम्पाऊंडच्या तारेला लागला. त्या तारेत वीज प्रवाह उतरला होता. या वीजेचा धक्का बसून त्यात त्यांचा मृत्यु झाला.
सोसायटीच्या कम्पाऊंटच्या तारेत वीज प्रवाह कसा उतरला, याचा पोलीस तपास करीत आहेत.
Web Title : Pune Crime News | Youth dies of electrocution after touching compound wire; Incidents in Kondvya Brahma Estate Society
- कर्ज थकीत असताना बँकेचे बनावट लेटरहेड तयार करुन दुसऱ्या बँकेतून 60 लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न; गहाण मालमत्तेचा परस्पर केला विकसन करारनामा
- Maharashtra Rain Update | राज्यात पुढील 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामानाचा अंदाज
- Chitra Wagh | ‘उद्धवजी तुम्ही मर्यादा ओलांडल्या, तुमच्या सारख्यांचा बुरखा लवकरच फाटणार’, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- ACB Trap On PSI News | 1 लाख दिले तर गुन्हा B फायनल करतो, अन्यथा फसवणूकीच्या गुन्ह्यात आरोपी करतो; पीएसआय अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात