पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | अल्पवयीन मुलीला स्वत:चे जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी देऊन तिचा पाठलाग करुन विनयभंग (Molestation) केल्याची घटना हडपसर परिसरातील काळेपडळ येथे घडली आहे. हा प्रकार मागील दोन वर्षांपासून सुरु होता. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Pune Police) एका अल्पवयीन मुलाला (Minor) ताब्यात घेतला आहे. (Pune Crime News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने (वय-31) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanavadi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलावर आयपीसी 354 (अ), 354(ड), 504, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन ताब्यात घेतले आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या मुलीला आरोपीने स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करण्याची
धमकी दिली. तसेच तिला वारंवार फोन करुन आणि मेसेज करून तिची छळवणूक केली.
तर तिचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. याबाबत पीडित मुलीचे आई-वडील आरोपीला जाब विचारण्यासाठी
गेले असता त्याने तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी (Threats to Kill) दिली. फिर्यादी यांनी तक्रार देताच
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.
- Pune Crime News | पुण्यातील धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून
- Pune Accident News | पुणे सोलापूर रोडवर अपघातानंतर अग्नीतांडव; थांबलेल्या कंटेनरवर केमिकलचा टेम्पो धडकला, तीन वाहने जळून खाक
- Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु
- Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन
- ACB Trap News | 50 हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात