पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Accident News | सोलापूर – पुणे महामार्गावर (Solapur – Pune Highway) रस्त्याच्याकडेला थांबलेल्या कंटेनरवर (Container) केमिकल (Chemical) घेऊन जाणार्या टेम्पोने धडक दिली. त्यामुळे लागलेल्या या आगीत (Pune Fire News) या दोन वाहनांसह तीन वाहने जळून खाक झाली. ही घटना दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा येथे शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामुळे पहाटेपर्यंत महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. (Pune Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून पुण्याकडे येणार्या बाजूला सहजपूर फाटा येथे एक कंटेनर थांबला होता. यावेळी केमिकल घेऊन जाणारा टेम्पो पाठीमागून येऊन या कंटेनरवर धडकला. टेम्पोतील केमिकल सर्वत्र उडाले. त्यातून दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या टेम्पोतील केमिकल सर्वत्र उडाले.
ते महामार्गाच्या बाजूला थांबलेल्या टेम्पोवर पडले आणि या टेम्पोनेही पेट घेतला. काही क्षणात ही तीन्ही वाहने पेटली. काही वेळातच तीन्ही वाहने जळून खाक झाली. या आगीत एका वाहनाचा चालक भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या अपघातामुळे पहाटेपर्यंत महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
- Thane Crime News | माजी महापौराच्या भावाने गोळी झाडून पत्नीचा केला खून; त्यानंतर भावाचाही मृत्यु
- Retired ACP Anis Kazi Passed Away | सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त अनिस काझी यांचे निधन
- ACB Trap News | 50 हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
- Pune Crime News | येरवडा : मुलाचा सांभाळ करणार्यासच जीवे मारण्याची धमकी देऊन उकळली खंडणी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल