Pune Crime News | बापच निघाला निर्दयी; आपल्याच १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार

Molestation Case

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Crime News | आपल्या वयात आलेल्या अल्पवयीन मुलीशी (Minor Girl) वारंवार शारीरीक अश्लिल चाळे करुन बापानेच तिचा विनयभंग (Molestation Case) केला. तसेच आपल्याच पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join our Whatsapp GroupTelegram, and facebook page for every update

येरवड्यातील सुभाषनगरमध्ये शनिवारी रात्री ११ वाजता हा प्रकार घडला. (Pune Crime News)

याबाबत महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५६०/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ४० वर्षाच्या बापावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना १६ वर्षाची मुलगी आहे. घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन फिर्यादी यांचा पती आपल्या मुलीला जवळ बोलावून तिच्याशी अश्लिल चाळे करायचा. तिच्या अवघड जागेवरुन हात फिरत असे. ही बाब फिर्यादी यांना समजल्यावर त्यांच्यात शनिवारी रात्री ११ वाजता वाद झाला. तेव्हा त्याने फिर्यादींना मारहाण (Beating) करुन धमकावले. त्यांच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. पत्नीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक गाताडे (PSI Gatade) तपास करीत आहेत.

Web Title  : Pune Crime News | The father turned out to be ruthless; Molestation of his own 16 year minor daughter, unnatural abuse of his wife